लेकीचे झाड
Mr. K.S. Pukale, Asst. Professor,
Mechanical Engineering Department
kspukale@coe.sveri.ac.in,
SVERI’s COE, Pandharpur
लेकीचे झाड ही संकल्पना ज्यांना मुलगी आहे त्यांनी लेकीच झाड म्हणून एक झाड लावून मुली सोबत त्या झाडाचा अभिषेक करण्यात आला आहे .. जेणे करून लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला जेव्हा केव्हा गावात येईल तेव्हा ते झाड बहरलेले दिसायला हवे ... सध्याच्याया परिस्थितीत माणसांची नाती बहरलेली दिसत नाही म्हणून बहरलेले माहेरच झाडहेकायमसासरच्यात्यामुलीलाआयुष्यभरासाठीसावलीचाआधारदेईल .म्हणूनहीसंकल्पनाडोळ्यासमोरठेवूनआम्हीवृक्षारोपणकरतआहोतयासंकल्पनेलाअनुसरूनगावामध्येसाधारण 1000 झाडांचेलागवडीचेउद्दिष्टडोळ्यासमोरठेवूनकामकरतआहोतसद्यस्थितीत वृक्षारोपण ही काळाची गरज आहे ही गरज ओळखून मिळता साधनाने मिळेल त्या परिस्थितीने फक्त वृक्ष लागवड करणे हेच उद्दिष्ट समोर ठेवले तर सर्वांना सोबत घेऊन काम करत गेलास कुठल्याही गोष्टीची अडचणी निर्माण होत नाही अथवा त्या अनंत अडचणी वरती मात करून तुम्ही तुमचे चांगले कार्य करू शकता याचा भाग म्हणून गावातील राजकारणाने एकमेकांची डोकी फोडणारी तरुण मंडळी निसर्गाच्या या कामासाठी एकत्र यायला लागली प्रत्येकाच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हायला लागली प्रत्येकाला वृक्षाचे महत्व कळू लागले प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने झाडे लावण्यास सुरुवात केली तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्यावाढदिवसानिमित्तएकझाड लावावे व त्याचे संगोपन कमीत कमी पुढील तीन वर्ष काळजीने करावे तसे केल्यास झाडाची योग्य ती वाढ झाल्यानंतर ते स्वतः जमिनी मध्ये व्यवस्थितपणे तग धरु शकतो हळूहळू लोकांची मानसिकता बदलू लागली लोकांमध्ये देशी प्रकारचे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी याकडे लक्ष देत आहोत त्याच प्रमाणे भारतीय आयुर्वेदात भारतामध्ये दुर्मिळ अशा औषधी वनस्पती उपलब्ध होत्या परंतु काँक्रिटच्या याजंगलांमध्ये हळूहळू नष्ट होत चालला आहेत हे कुठेतरी थांबण्यासाठी आपण यासाठीही पुढाकार घेतला पाहिजे एक उत्तम उदाहरण म्हणजे वृक्ष पांगारा
संस्कृत आयुर्वेदातील नाव:पारिभद्र
लहानपणी पाठीला लाकूड बांधून पोहायला कोण कोण शिकले, जुन्या लोकांना नक्की माहीत असेल ते लाकूड पांगारा असायचे. पांगारा देशी वृक्ष असून आपण वृक्षारोपणात या झाडाचा वापर करतो, पांगारा झाडाची साल व पाल्याच्या आयुर्वेदिक उपयोग तर आहेच, पण याला लाल मनमोहक फुले येतात पक्षी, भुंगे, मधमाश्या यातील मध पिण्यासाठी येतात त्यामुळे परागी भवन होते परागी भवन चांगले झाले तर उत्पादन चांगले येते, शेताच्या बांधा वर पाहिले हे वृक्ष दिसत होती पण आत्ता पांगारा वृक्ष फार कमी दिसत आहे. पांगारा लावला पाहिजे व त्याचे संगोपन झाले पाहिजे, एकमित्र, एक वृक्ष ग्रुप वृक्ष रोपणात ही झाडे लावतो व जगवतो आत्ता पर्यंत 100 झाडांपेक्षा जास्त झाडे लावली आहेत.
आठ दिवसांपूर्वी मित्राला मुलगी झाली. तिच्या बारशाची असतानाच गावाने सुरू केलेल्या 'लेकीचे झाड' ही अनोखी रित पार पाडण्याची तयारीही सुरू झाली.
गावांमध्ये सुरू असलेल्या लेकीचे झाड या संकल्पनेला साथ म्हणून नव्या जन्मलेल्या मुलीच्या नावाने रोप लावण्याची आणि मुलीच्या वाढीसोबत रोपाच्या वाढीचीही काळजी घेण्याची परंपरा सुरू केली. घरी जन्मलेल्या या कन्यारत्नाच्या उपस्थितीत आज वडाचं रोपटं लावलं गेलं. मुलगीही जसजशी मोठी होईल तसतसं रोपट्याचं झाड होत जाईल. डोळ्यांसमोर मोठी होणारी पोर आणि तिच्यासोबतच मोठं होत गेलेलं झाड या आनंदाच्या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आणि गावातली वृक्षांची संख्या वाढवण्यासाठी गावकऱ्यांमध्ये एकत्र येऊन एक चांगला उपक्रम राबविला जात आहे
|
|
Comments
Post a Comment