जीवन
Chetan Chandrakant Jadhav
ccjadhav@coe.sveri.ac.in
Assistant Professor
SVERI’s College of Engineering Pandharpur
नौकरीच्या शोधात अंगणापासून बाल्कनी पर्यंत कस आलो कळलंच नाही,
सुखाच्या शोधात सोन्यासारखे लोक सोडून अनोळखी गर्दीत कधी रमलो कळलच नाही,लहान म्हणता म्हणता वय कधी निघून गेले कळलंच नाही, विनाकारण धावत होतो आपण, हाती काहीच कसे उरले नाही कळलंच नाही, स्वप्न पूर्ण करता करता कधी चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या कळलच नाही, आता तरी थांबावे जरा, चार मित्रांना भेटावे म्हणतो तर, मित्र कुठे सुटले मागे कळलच नाही, काही कळण्याच्या पलीकडे जाण्याआधीच आहे त्या सगळ्या गोष्टीची किंमत करायला शिका!
विदयार्थी जीवन
आजचे विदयार्थि जीवन म्हणजे नानाविध प्रश्नांची सर्कसच! या सर्कशीतील तंत्र आणि मंत्र जो साध्य करतो तोच यशाचे शिखर गाठतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की, असा विदयार्थी खरा ज्ञानार्थी न होता केवळ परीक्षार्थी बनतो. याचे एक कारण हे ही आहे की, आजच्या विदयार्थ्यांवर विविध विषयांचा फार मोठा बोजा आहे. मर्यादित वेळेत अभ्यास कसा संपवायचा हे विदयार्थ्यांपुढील मोठे प्रश्न चिन्ह आहे.
तेवढ्याने काय संपते! विदयार्थी हा सर्व गुण संपन्न असावा अशी सर्व पालकांची व शिक्षकांची अपेक्षा. आपण विदयार्थिदशेत जे करू शकलो नाही ते सारे आजच्या विदयार्थ्यांनी करावे असे त्यांना वाटते. अशा प्रसंगी विदयार्थ्यांचा मात्र कोंडमारा होतो. एखादया विदयार्थ्याला सुनील गावसकर व्हावेसे वाटते; तेवढयात जयंत
नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाचा आदर्श त्याच्यासमोर ठेवला जातो. मुलाने आपली प्रकृती उत्तम ठेवावी असे सांगणारे पालक, त्याच मुलाने व्यायामशाळेत जरा जास्त वेळ घालविला की, लगेच म्हणतात, “काय आखाड्यात उतरायचे काय!" त्यामुळे आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे, हयाबद्दल विदयार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. अभ्यासात यश मिळवून तरी आजच्या विदयार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत का? उच्चशिक्षणासाठी त्याला हव्या त्या शिक्षण शाखेत प्रवेश घेता येतो का? तेथेही अनेक अडसर! जागा कमी, मागणी अधिक! या व्यस्त प्रमाणामुळे सर्वत्र झिम्मड. मग भ्रष्टाचार, वशिलेबाजी आलीच. विदयार्थ्याला आवडत असलेली शिक्षण शाखा तो निवडू शकत नाही; मग तो अगतिक होतो वा भरकटतो.
अशा या विदयार्थि जीवनात अनेक मोह विदयार्थ्याला ग्रासावयास उभे असतात. कधी चुकून, तर कधी वैफल्याने तो त्यांकडे वळतो. अशा सर्व समस्यांवर मात करून विदयार्थ्याने उत्तम यश संपादन केले तरी त्याचे प्रश्न संपत नाहीत. शिक्षणानंतर नोकरीचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकतो. बेकारीचा भस्मासूर त्याला वाकुल्या दाखवितो. स्वतःचा व्यवसाय हा बेकारीवरचा उपाय त्याला दाखविला जातो. पण तेथेही जीवघेणी स्पर्धा व गैरव्यवहार त्याला रोखतात.
प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! विचारवंतांच्या मते, माणूस हा आयुष्यभर विदयार्थीच असतो. मग प्रश्न पडतो की हे प्रश्न सुटणार तरी केव्हा? आणि हे प्रश्नही त्याला सतत साथ देत असतात.
सकारात्मक जीवन आणि जीवनाची किंमत
एकदा एक प्रवासी जोडपे एका बसमधून पर्वतीय प्रदेशातून प्रवास करीत होते. बराच प्रवास केल्यावर एका ठिकाणी त्यांनी बसमधून उतरण्याचा निर्णय घेतला. ते प्रवासी जोडपे उतरल्यावर बस पुन्हा सुरु झाली आणि आपल्या मार्गाला लागली. काही अंतर गेल्यावर त्या बसवर डोंगरातून गडगडत येणारा एक मोठा दगड पडला आणि त्याने बसमधील सगळ्या प्रवाशांचा मृत्यू ओढवला. हे दृश्य पाहून त्या बसमधून उतरलेल्या प्रवासी जोडप्याने म्हटले,.......अरेरे ! हे काय झाले. आम्ही त्या बसमध्ये असतो तर बरे झाले असते.........तुम्हाला काय वाटते, त्या जोडप्याने असे का म्हटले असेल?..........जरा डोके खाजवा ............काय म्हणता डोके चालत नाही. अरे ! अशी हार मानू नका.........थोडे आणखी प्रयत्न करा. उत्तर नक्की सापडेल. काय म्हणता उत्तर सापडत नाहीय. ठीक आहे. उत्तर आहे..........
जर का ते जोडपे उतरण्याऐवजी त्या बसमध्येच असते, तर त्याना जो उतरण्यासाठी वेळ लागला तो न लागता, बस न थांबताच तशीच पुढे गेली असती. परंतू तसे न होता, बस त्यांना उतरविण्यासाठी काही वेळ तेथे थांबली. त्यामुळे झाले काय की तिला थोडा वेळ लागला. हा जो मधला वेळ होता तो ती बस तेथे त्यांना उतरण्यासाठी थांबली नसती तर लागला नसता. म्हणजेच ती बस दगड पडण्याच्या वेळी तेथे नसती. ती काही अंतर पुढे गेलेली असती. आणि म्हणूनच हा अपघाताचा प्रसंग आलाच नसता.
याचाच अर्थ असा की जीवनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा आणि दुस-यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर रहा. जीवनामध्ये बरेच वेळा यशाच्या विरोधी अपयश नसून, हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून जाणे असते. (म्हणजेच पलायन होय.)
विजेता कधीच पळून जात नाहीत आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत. काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका. त्यासाठी झगडा, झटापटी करा आणि त्या घडवून आणा.
तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू नका. तुम्ही तुमची स्वत:ची किंमत स्वत:च निर्माण करा!!!
निष्कर्ष: -
जीवन हे युद्धभूमी समान आहे आणि जेव्हा कोणी आशंकाग्रस्त होतो, त्या क्षणी तो टाळाटाळ ग्रस्त होऊ लागतो. वास्तविकता ही टाळाटाळ निर्दोष वाटते, पण या सवयीच्या कारणामुळे आपण आपल्या क्षमतांना पूर्णपणे विकसित करत नाही.
“जीवनात वेळ कशीहि असो.
वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते,
पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका.
जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”
जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज
संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.
माणसाला स्वत:चा “photo”
काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.
*************
संदर्भ-
1. https://www.groupdiscussionideas.com/city-vs-village/
2. https://www.essaymarathi.com/2020/02/student-life-essay-in-marathi.html
Comments
Post a Comment